पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आता अमृता फडणवीस यांची आदित्य ठाकरेंवर थेट टीका

अमृता फडणवीस आणि आदित्य ठाकरे

एका बाजूने माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस शिवसेनेवर थेट प्रहार करत असताना दुसऱ्या बाजूने त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही शिवसेनेवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या टीका करताना पाहायला मिळत आहे. राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपसोबतची युती सोडल्यापासून अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून अनेक मुद्यावरुन शिवसेनेवर टीकेचे बाण सोडल्याचे पाहायला मिळाले. आता त्यांनी थेट राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्या त्या विधानावर आदित्य ठाकरेंचे उत्तर

शिवसेनेने बांगड्या भरल्या असतील पण आम्ही नाही, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेतून केले होते. या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली होती. मी काही विधानांना उत्तर देणे टाळतो. पण देवेंद्र फडणवीस यांनी बांगड्यांच्या त्या विधानावरून माफी मागितली पाहिजे. कणखर असलेल्या महिला बांगड्या घालतात. राजकारण आपल्या पद्धतीने पुढे चालत राहिल. पण टीका करण्याची पद्धत बदलायला हवी. एका माजी मुख्यमंत्र्यांकडून असे विधान अपेक्षित नसते, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते.

शेतकऱ्यांनी रक्ताने लिहिली राज्यपालांना पत्रे'

त्याच्या या प्रतिक्रियेनंतर अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलय की, रेशमी किड्याला आयुष्यातील 'उपहास' समजणार नाही. कारण पूर्वजांनी विणलेल्या सुखासीन 'रेशमी' आयुष्याचा उपभोग घेत त्यांची भरभराटी होते. देवेंद्र फडणवीसजी, तुमच्या संघर्षाचा आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचा अभिमान वाटतो. या ट्विटमध्ये त्यांनी आदित्य ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि भाजपला टॅग केले आहे.

'शिवसेना-भाजपने पुन्हा एकत्र यावे, आपण मिळून सरकार स्थापन करु'

आतापर्यंत अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेवर शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी पलटवार केल्याचे पाहायला मिळाले आहे. पण उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटवर कोणतीही प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले नाही. अमृता फडणवीस यांनी थेट आदित्य ठाकरेंना मेन्शन करुन केलेल्या ट्विटवर शिवसेनेना काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.