पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नुसत्या आडनावाने कोणी ठाकरे होत नाही, अमृता फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर टीका

उद्धव ठाकरे आणि अमृता फडणवीस

स्वतःच्या नावापुढे ठाकरे आडनाव वापरून कोणीही ठाकरे होत नाही. त्यासाठी त्या व्यक्तीने स्वतःच्या कुटुंबाचा विचार करण्यासाठी लोकांच्या आपल्या पक्षाच्या भल्याचा विचार केला पाहिजे. ठाकरे आडनाव वापरणाऱ्या व्यक्तीने तत्त्वनिष्ठा आणि सच्चेपणा दाखवला पाहिजे, असे ट्विट करीत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये त्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचे कार्यालय या दोन्ही अधिकृत ट्विटर हँडलला मेन्शन केले आहे.

अमिताभ बच्चन राष्ट्रीय चित्रपट सोहळ्याला राहणार अनुपस्थित

अमृता फडणवीस आपल्या ट्विटच्या माध्यमातून कायम सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात. त्यांच्या ट्विटसना बरेच वेळा मोठा प्रतिसाद मिळतो. पण अनेक वेळा ट्विटरवर त्यांना ट्रोलही केले जाते. याची पर्वा न करता अमृता फडणवीस आपले म्हणणे ट्विटरच्या माध्यमातून मांडत असतात. 

रविवारी रात्री त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे १४ डिसेंबरचे एक ट्विट रिट्विट करताना त्यातून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांच्या त्या ट्विटमध्ये त्यांनी राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. राहुल गांधी यांचे वक्तव्य निषेधार्ह असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्याचवेळी सावरकरांनी जे महान कार्य करून ठेवले आहे. त्याच्या जवळपासही राहुल गांधी नाहीत. एवढेच नव्हे तर त्यांनी स्वतःला गांधीही समजू नये. कारण केवळ गांधी आडनाव वापरून कोणीही गांधी होऊ शकत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. याच ट्विटचा आधार घेत अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

डॉ. नंजुंदन यांचा मृत्यू, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला

अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे की देवेंद्र फडणवीस यांनी जे म्हटले आहे ते अगदी बरोबर आहे. केवळ आडनाव वापरून कोणी ठाकरे होऊ शकत नाही. त्यासाठी सच्चेपणा आणि तत्त्वनिष्ठा असावी लागते. आपल्या कुटुंबाचा विचार करण्याआधी लोकांच्या आणि पक्षाच्या भल्याचा विचार करावा लागतो, असे त्यांनी म्हटले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:amruta fadnavis criticized uddhav thackeray says one can not be thackeray just putting thackeray surname