पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महाराष्ट्रात पवारांशिवाय कुणाकडे टॅलेंट नाही का? - अमित शहा

अमित शहा

आमचा पक्ष महाराष्ट्राच्या विकासासाठी, विदर्भाच्या विकासासाठी काम करतोय आणि दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या मुलांच्या विकासासाठी काम करताहेत, अशी टीका करीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात पवारांशिवाय इतर कोणाकडे टॅलेंट नाही का, असा प्रश्न शुक्रवारी उपस्थित केला. चिखलीमध्ये जाहीर सभेत बोलताना त्यांनी गेल्या पाच वर्षांतील भाजप सरकारच्या कामांचा पाढा वाचला. त्याचवेळी विरोधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली.

३७१ कलमाबद्दलही बोला, शरद पवारांचा भाजपला प्रश्न

अमित शहा म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्हीही परिवारवादी पक्ष आहेत. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांची मुले यांचाच विचार होतो. महाराष्ट्रात पवारांशिवाय इतर कोणाकडे टॅलेंट नाही का, केवळ आपले कुटुंब मोठे करण्याचेच यांचे प्रयत्न सुरू आहेत. यांच्याकडे १५ वर्षे सत्ता होती. त्यावेळी महाराष्ट्राला लुटण्याचेच काम यांनी केले. परिवारवादी पक्ष महाराष्ट्राचा कधीच विकास करू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.

'अयोध्येतील जागा मुस्लिमांनी राम मंदिरासाठी देऊन टाकावी

शहीदांच्या वीरपत्नीसाठी बांधण्यात आलेल्या आदर्श गृहसंकुलातही यांनी घोटाळा केल्याचा आरोप करीत अमित शहा म्हणाले, गेल्या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप केला जाऊ शकत नाही.