पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमर, अकबर, अँथनीचे सरकार जास्त टिकणार नाही: रावसाहेब दानवे

रावसाहेब दानवे

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाआघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राज्यातील तीन पक्ष एकत्र येऊन त्यांनी सरकार स्थापन केलेले आहे. हे अमर, अकबर, अँथनीचे सरकार असून ते जास्त काळ टिकणार नाही, असा टोला त्यांनी लगावला. भाजप-शिवसेनेच्या युती सरकारच्या योजनांना ब्रेक लावण्याचे काम हे सरकार करत आहे. या योजनांना ब्रेक न लावता, नव्या योजनाही प्रत्यक्षात आणाव्यात, असेही दानवे यांनी म्हटले. यावेळी त्यांनी शिवसेनेचे नेते आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावरही टीका केली. 

'CAA संदर्भातील विरोध कमी होईल, पण मोदी-शहांना हे जमणार आहे का?'

नाशिक येथे पक्षाच्या बैठकीस आल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, मोदी सरकारने वर्षभरात अनेक चांगले निर्णय घेतले. त्यात सीएएचा निर्णय महत्त्वाचा आहे. मात्र, विरोधक याचा गैरप्रचार करत आहेत. मुस्लिम समाजात हा कायदा नागरिकत्व हिरावून घेणारा असल्याची भीती निर्माण केली जात आहे. मात्र, कोणालाही घाबरण्याचे कारण त्यांनी स्पष्ट केले. 

CM उद्धव ठाकरे यांच्या विनंतीनंतर बेमुदत शिर्डी बंद मागे

यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंची महत्त्वकांक्षी योजना मुंबईतील नाइट लाइफला विरोध दर्शवला. युती सरकारच्या काळातही शिवसेनेची ही मागणी होती. परंतु, ती आम्ही फेटाळली होती. या प्रयोगाला भाजपचा विरोध कायम असल्यचे ते म्हणाले. त्याचबरोबर बेळगावचा प्रश्न निकाली निघाला पाहिजे. यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येणे गरजेचे त्यांनी स्पष्ट केले.

स्मिथ भारी खेळला, पण 'विराट' स्मित हास्य लाभलं कोहलीलाच!