पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जातीऐवजी आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सर्वांनाच आरक्षण मिळावेः उदयनराजे

उदयनराजे भोसले

जातीवर आधारित आरक्षणामुळे गुणवत्तेला संधी मिळत नाही. अनेकजण गुणवत्ता असूनही आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत किंवा जातीचा आधार मिळत नसल्याने ते मागे पडतात. समाजात दुही आणणारे आरक्षण धोरण बदलण्याची गरज असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. सरकारने जाती-जातीत भेद आणणारे जातीनिहाय आरक्षण बंद करुन आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सर्वांनाच आरक्षण द्यावे अशी मागणीही त्यांनी केली. ते सोलापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 

उदयनराजे यांनी यावेळी ईव्हीएमचा मुद्दा ही छेडला. त्यांनी महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका या पूर्वीप्रमाणेच मतपत्रिकेद्वारेच घेण्याची आग्रही मागणी केली. देशात अनेक ठिकाणी ईव्हीएमवर दाखवण्यात आलेले मतदान आणि प्रत्यक्ष मतदान यात तफावत आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. 

राज्यातील सर्वांत श्रीमंत उमेदवार माहितीये?

यावेळी उदयनराजेंनी दुष्काळवरुन फडणवीस सरकारवरही निशाणा साधला. शिवाजी महाराजांच्या काळातही दुष्काळ होता पण त्यांचे योग्य नियोजन होते. हल्लीच्या सरकारकडे दुष्काळाबाबत नियोजन दिसत नाही, अशी टीका केली.

धक्कादायक! महाराष्ट्रातील १५ खासदारांवर गंभीर गुन्हे

तत्पूर्वी, उदयनराजे भोसलेंनी तुळजापूर येथे जाऊन श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राजकारण करत असताना सामाजिक कार्याला महत्व दिले. राजकारण केले नाही, जर राजकारण केले असते तर निम्म्याहून अधिक राजकारणी आज दिसले नसते. त्यामुळे राजकारण करत असताना समाजकारणाला महत्व दिले पाहिजे, असे ते म्हणाले.

दरम्यान, गुरुवारी सातारा येथील पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्रिपद हे एखाद्या कारकुनासारखे असल्याचे म्हटले होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा साताऱ्याचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले असतील, अशा पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावर मुख्यमंत्र्यांचे काम हे चार भिंतींत बसलेल्या कारकुनासारखे असते. त्यांना फक्त प्रशासन सांभाळायचे असते. पण, आपल्याला चार भिंतींत बसणे नव्हे, तर मुक्त फिरणे आवडते, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:All the economically backward people should get reservation instead of caste says ncp mp udayanraje bhosale