पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अकोल्यातील संतप्त शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना कोंडले

अकोला शेतकरी आंदोलन

अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेले पीक गेल्यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे. अशामध्ये विमा कंपनी शेतकऱ्यांना नुकसानीचा विमा देण्यास टाळाटाळ करत असल्याने अकोल्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन करत विमा कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्याच कार्यालयात कोंडल्याची घटना घडली आहे. 

रायगड : क्रिप्टझो कंपनीत स्फोट; दोघांचा मृत्यू तर १६ जखमी

अकोला शहरातील गोरक्षण मार्गावर असलेल्या 'न्यू इंडिया इन्श्युरन्स' कंपनीच्या कार्यालयात हा प्रकार घडला आहे. डिसेंबर ते जुलै दरम्यान अवकाळी पावसामुळे केळीचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचा विमा कंपनीने सप्टेंबरमध्ये देणं गरजेचे होते. मात्र विमा कंपनी शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याने शेतकरी आक्रमक झाले.

... अशा शेजाऱ्याशी कोण चर्चा करेल, जयशंकर यांनी पाकला फटकारले

संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट विमा कंपनीच्या कार्यालयात घुसून त्याठिकाणी असलेल्या १४ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्याच कार्यालयात कोंडून ठेवले. शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे विमा कंपनीनं शेतकऱ्यांना केळी विम्याचे दावे २१ नोव्हेंबरपर्यंत निकाली काढण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी रात्री उशिरा हे आंदोलन मागे घेत अधिकाऱ्यांची सुटका केली. 

दिशाभूल करण्याचा हेतू नाही, सई, सिद्धार्थचं स्पष्टीकरण