पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कर्जमाफीची प्रक्रिया दोन-तीन महिन्यात पूर्ण करणार: अजित पवार

अजित पवार

कर्जमाफीची प्रक्रिया येत्या दोन-तीन महिन्यात पूर्ण करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र अदयापही कर्जमाफी न झाल्यामुळे हिवाळी अधिवेशनामध्ये याच मुद्द्यावरुन विरोधीक आक्रमक झाले आहेत. तात्काळ कर्जमाफी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 

'बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा'

शेतकरी कर्जमाफीसंदर्भात अजित पवार यांनी सांगितले की, शेतकरी कर्जमाफी कशी द्यायची याबाबत मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांमधील कर्जमाफीचा अभ्यास सुरु आहे. कर्जमाफी देताना आधार लिंक करुन कर्जमाफी देता येईल का यावर देखील विचार सुरु आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. कर्जमाफीसंदर्भात सरकार कधी निर्णय घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. 

हिंसक आंदोलनाप्रकरणी अहमदाबादेत ४९ जण ताब्यात

दरम्यान, कर्जमाफीसंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांची गुरुवारी बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये तब्बल एक तास याबाबत चर्चा झाली. या चर्चेनंतर कर्जमाफीबाबत निर्णय झाला की जाहीर करु, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.   

CAA, NRC वरून संयुक्त राष्ट्रसंघाने देशात सार्वमत घ्यावे- ममता