पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मुख्यमंत्र्यांनी संमती दिली तर २३ तारखेला मंत्रिमंडळ विस्तार'

अजित पवार (ANI)

हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली तर हिवाळी अधिवेशनानंतर २३ तारखेला मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले. मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर करण्यात यावा अशी अपेक्षा सर्व आमदारांनी व्यक्त केली आहे.  

NDA तून बाहेर पडलो असलो, तरी आम्ही UPA सोबत नाही - संजय राऊत

दरम्यान, हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची आज दुपारी बैठक होणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. तसंच, शरद पवार या बैठकी दरम्यान कर्जमाफीसंदर्भात आपले म्हणणे मांडतील आणि काय निर्णय घ्यायचा हे ठरवतील असे देखील त्यांनी सांगितले. 

दिल्लीत एअर हॉस्टेसची आत्महत्या, घरमालकाच्या जाचामुळे

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमादार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये त्यांनी हिवाळी अधिवेशनानंतर दोन दिवसांच्या आत मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल असे सांगितले होते. तसंच, राष्ट्रवादीच्या कोट्यातील मंत्रिपदे ही फक्त राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्यांनाच दिली जातील, इतरांचा विचार होणार नाही, असे त्यांनी सांगितले होते. 

ट्रम्पविरोधात कनिष्ठ सभागृहात महाभियोग मंजूर, आता पुढे काय?

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ajit pawar says if chief minister gives consent then extend the cabinet on the 23 december