पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सिंचन घोटाळाः अजित पवारांच्या क्लीनचिटवर फडणवीसांचा आक्षेप

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळा प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) क्लिन चीट दिली आहे. एसीबीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे हे स्पष्ट झाले आहे. परंतु, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर आक्षेप नोंदवला आहे. एसीबीचे शपथपत्र कोर्ट स्वीकारणार नाही, असे सांगत जुन्या शपथपत्राशी नवीन शपथपत्र पूर्णपणे विसंगत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

'फक्त मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी ही आघाडी केली'

एसीबीने सादर केलेले शपथपत्र हे संक्षिप्त आहे. आधीच्या शपथपत्रात सादर करण्यात आलेल्या गोष्टी चुकीच्या होत्या हे सांगणारे पुरावेच नाहीत. सातत्याने अधिकाऱ्यांना दोषी ठरवले जात आहे. त्या आदेशांवर मंत्र्यांची सही आहे. नवीन शपथपत्र हे दिशाभूल करणारे आहे. या शपथपत्राला आमचा पूर्णपणे विरोध असल्याचे ते म्हणाले. 

'इटलीवरुन आलेल्यांना नागरिकत्व मिळते मग बांगलादेशींना का नाही?'

मंत्र्यांची सही असूनही अधिकाऱ्यांवर खापर फोडले जात असल्याचा त्यांनी दावा केला. काही गोष्टींचा जाणीवपूर्वक समावेश करण्यात आला आहे. आवश्यकता पडल्यास आम्हीही यात हस्तक्षेप करु. प्रकरण न्यायालयात असल्यामुळे आम्हाला मर्यादेत विधिमंडळात आवाज उठवावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

देशासाठी साहसी निर्णय घ्यावे लागतातः पंतप्रधान मोदी

यापूर्वीच्या शपथपत्रात गुन्हा कसाकसा घडत गेला. भ्रष्टाचार कसा झाला यासह सर्व इत्यंभूत माहितीचा त्यात समावेश करण्यात आला होता. या आधी अजित पवार यांना विदर्भातील काही सिंचन घोटाळे प्रकरणात पूर्णत: क्लीन चीट देण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिस अधिक्षकांनी नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या शपथपत्रात अजित पवार यांच्याविरूद्ध कोणतीही फौजदारी कारवाई करता येणार नाही, असे नमूद केले होते.

कर्जमाफीची प्रक्रिया दोन-तीन महिन्यात पूर्ण करणार: अजित पवार

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ajit pawar get clean cheat in irrigation scam bjp leader devendra fadnavis object on this