पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अलिबागमधील मांडव्याजवळ बोट बुडाली, ८८ प्रवाशी सुखरुप

अजंठा बोट उलटली

मुंबईहून अलिबागमधील मांडव्याच्या किनाऱ्याकडे येणारी अजंठा प्रवासी बोट खराब हवामानामुळे बुडाली. सुदैवानं या बोटीतून प्रवास करणाऱ्या ८८ प्रवाशांना वाचविण्यात यश आलं आहे. 

कोरोनामुळे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराकडूनही महत्त्वाची खबरदारी

गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा या प्रवासादरम्यान  सकाळी दहाच्या सुमारास अजंठा बोट उलटली.  मांडवा जेट्टीपासून जवळच खडकावर आदळून प्रवासी बोट उलटली अशी प्राथमिक माहिती स्थानिक वृत्तवाहिन्यांच्या हवाल्यानं समजत आहे. मांडवा जेट्टीपासून जेमतेम १ किलोमीटर अंतरावर असताना ही बोट उलटली. 

अचानक बोट बुडू लागल्याने बोटीवरील प्रवास करणारे पुरुष, महिला व लहान मुले यांनी घाबरून आरडाओरड केली. बोटीवरील कर्मचाऱ्यांनी मांडवा पोलिसांजवळ संपर्क साधला. यावेळी सागरी गस्तीवर निघालेल्या  रायगड जिल्हा पोलीस दलातील  सद्गुरूकृपा बोटीवर नियुक्त असलेले  पोलीस कर्मचारी प्रशांत घरत यांनी ट्रॉलरवरील तांडेल व खलाशी यांच्या मदतीने सर्व ८८ प्रवाश्यांचे जीव वाचवले.

या सर्व  प्रवाशांना पोलीस गस्तीवरील नौकेच्या सहाय्याने जेट्टीवर सुखरूप आणले आहे.

बिल गेट्स यांचा मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाचा राजीनामा