पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भगवानबाबा गडावर चोरी; आरोपी सीसीटीव्हीत कैद

भगवानबाबा गड

अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यात असणाऱ्या भगवानबाबा गडावर चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. भगवानबाबा गडावरील संग्रहालयात असणाऱ्या रायफल आणि एक तलवार चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. पाथर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. 

मराठीचं वाकडं करण्याची हिंमत कुणातही नाही: मुख्यमंत्री

भगवानबाबा गडावर बाबांच्या वापरातील वस्तूंचे संग्रहातल आहे. भक्तांना भगवानबाबांच्या वापरातील वस्तूंचे दर्शन घेता यावे यासाठी या वस्तू गडावर संग्रहालयात तयार करुन त्यात ठेवण्यात आल्या आहेत. या संग्रहालयातील २ बोअरची रायफल आणि एक तलवार गुरुवारी सकाळी चोरीला गेल्याचे उघड झाले. 

केंद्र आणि दिल्ली सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेतली - काँग्रेस

याप्रकरणाची माहिती मिळताच पाथर्डी पोलिसांनी भगवानबाबा गडावर धाव घेतली. पोलिस उपनिरीक्षक राठोड यांनी गडावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यामध्ये तीन संशयित आरोपी दिसत आहेत. पाथर्डी पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे भगवानबाबा गडावरील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कुणाल कामरावरील प्रवास बंदी इंडिगोकडून ३ महिन्यांनी कमी