पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अहमदनगरमध्ये बॉम्बच्या स्फोटात दोघांचा मृत्यू

ब्रेकिंग न्यूज

अहमदनगरमध्ये लष्कराच्या हद्दीत बॉम्बचा स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये भंगार गोळा करणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे अहमदनगरमध्ये खळबळ उडाली आहे. के के रेंजजवळील खारेकर्जुने परिसरात ही घटना घडली आहे. बॉम्बच्या स्फोटामध्ये आकाश गायकवाड आणि संदिप धिरवडे याचा मृत्यू झाला आहे. अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

विमानाचे काम करताना दरवाजात अडकून स्पाईसजेटच्या तंत्रज्ञाचा मृत्यू

अहमदनगरच्या खारेकर्जुने येथील केके रेंज परिसरात भंगार गोळा करत असताना आकाश आणि संदीप यांना लष्कराचा बॉम्ब सापडला. लष्कराने युध्द सरावा दरम्यान वापरलेला बॉम्ब लष्कर हद्दीमध्ये पडला होता. तो बॉम्ब हे दोघे जण घरी घेऊन गेले. बॉम्बमधील शिसं काढत असताना त्याचा स्फोट झाला आणि त्यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असल्याचे समोर आले आहे. अहमदनगरच्या लष्करी छावणीमध्ये जानेवारी ते एप्रिलपर्यंत रनगाड्याचा सराव केला जातो. याच सरावा दरम्यान न फुटलेला जिवंत बॉम्ब फुटून भंगार गोळा करणाऱ्या या दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकराच्या  घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत.

मध्य आणि हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे हाल