पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शेतकऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा; एकाच अर्जावर मिळणार अनेक योजनांचा लाभ

शेतकरी

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. यापुढे शेतकऱ्यांना कोणत्याही योजनांचा लाभ घेताना अडचणी येणार तसंच त्यांना प्रत्येक योजनेसाठी वेगळा अर्ज करण्याची गरज लागणार नाही. कारण यापुढे शेतकऱ्यांना एकाच अर्जावर अनेक योजनांचा लाभ घेता येणार आहे, याबाबतची घोषणा कृषीमंत्री दादा भुसे यांनी बुधवारी केली. 

 

ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यावर मोदींनी व्यक्त केला आनंद, म्हणाले...

कृषीमंत्री दादा भुसेंनी सांगितले की, 'एखाद्या शेतकऱ्याला अनेक योजनांमध्ये सहभागी व्हायचे असेल तर त्यांनी एकाच अर्जामध्ये त्या सर्व योजनांचा लाभ नोंदवावा. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार तसंच त्यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाच्या माध्यमातून ही संकल्पना राबवण्यात येणार आहे.'

कोरोनाची लागण झाल्याच्या भीतीनं शेतकऱ्याची आत्महत्या

तसंच, 'यावर्षी जर शेतकऱ्याला लाभ मिळाला नाही. तर पुढच्या वर्षात शेतकऱ्याला अर्ज करण्याची गरज नाही. त्याचा अर्ज आला आहे असे गृहित धरुन त्याला पुढच्या वर्षामध्ये लाभ मिळेल, असे देखील कृषी मंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होणार आहे. 

मनसेच्या मोर्चाचा इम्पॅक्ट; विरारमध्ये २३ बांगलादेशींना अटक

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:agriculture minister dada bhuse says farmers will benefit from many schemes on the same application