पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... आणि कृषिमंत्री पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर

दादा भुसे

शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी ‘कृषी मंत्री एक दिवस शेतावर’ हा उपक्रम राबविण्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी ७ फेब्रुवारीला नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात जाहीर केले होते. त्याची अंमलबजावणी आठवडाभराच्या आतच कृषीमंत्र्यांनी केली असून, आज त्यांनी मालेगाव तालुक्यातील वळवाडे, अजंग-वडेल, झोडगे आणि माळमाथा भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गावात कृषी अधिकारी, कृषी सहायक येतात का, अशी विचारणाही यावेळी कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना केली.

१ कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या प्रोफेशनल्सची संख्या वाचून धक्काच

शेतकऱ्यांना कृषी उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देतानाच त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक दिवस शेतावर हा उपक्रम दादा भुसे यांनी सुरु केला असून कृषी सचिव, आयुक्त यांनी १५ दिवसातून एकदा तर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दर आठवड्याला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधावा, अशा सूचना केल्या आहेत. या भेटीत पीक नियोजन, उत्पादन क्षमता याबाबत चर्चा करतानाच उपलब्ध बाजारपेठ आणि विविध कृषी योजनांविषयी शेतकऱ्यांना माहिती द्यावी, असेही दादा भुसे यांनी विभागाला सांगितले आहे.

VIDEO: एकमेकांचा पाठलाग करत काँग्रेस कार्यकर्त्यांची हाणामारी

नागपूर येथील शेतकरी पुरस्कार सोहळ्यामध्ये ही घोषणा करुन कृषिमंत्र्यांनी आजपासून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरु केली. मालेगाव तालुक्यातील वळवाडे येथील शांताराम गवळी या शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पीक विमा योजना, कांदा उत्पादन याबाबत त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी तुमच्याकडे येतात का, अशी विचारणाही कृषीमंत्र्यांनी यावेळी केली. दादा भुसे यांनी आज दिवसभरात अजंग-वडेल, झोडगे व माळमाथा भागातील गावातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन संवाद साधला.