पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सरकारचा मोठा निर्णय! धनगर समाजाला एसटी प्रवर्गातील सवलती मिळणार

धनगर समाजाची बऱ्याच दिवसांपासून असणारी मागणी मान्य

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाला मंजुरी देणाऱ्या फडणवीस सरकारने धनगर समाजाची बऱ्याच दिवसांपासून असणारी मागणी देखील मान्य केली आहे. आता धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातील २२ योजनांचा लाभ घेता येणार आहे. मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली. 

भाजपमध्ये उद्या चार आमदारांचा प्रवेश, राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. ते म्हणाले की, धनगर समाजाकडून बऱ्याच दिवसांपासून अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करुन घेण्याची मागणी करण्यात येत होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा ठराव संमत करण्यात आला आहे. राज्याच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या सर्व गोष्टींची राज्य सरकार पूर्ती करण्यास बांधिल असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

राज ठाकरे बुधवारी घेणार ममता बॅनर्जींची भेट

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरणार आहे. या निर्णयामुळे धनगर समाजातील विद्यार्थ्यांना अनुसूचित जमाती प्रवर्गातील २२ योजनांचा लाभ घेता येईल. धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा न्यायालयात असल्यामुळे तो राज्य सरकारच्या अधिकार क्षेत्रात नसून केंद्र सरकारच्या अधिकार क्षेत्रात असल्याचेही जानकरांनी यावेळी सांगितले. यासंदर्भातही राज्य सरकार धनगर समाजाच्या बाजूने उभे असेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:after the maratha reservation implemented Fadnavis fadnavis govt take Decision for dhangar community