पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नागपूरमध्येही एकाला कोरोनाची लागण, राज्यातील रुग्णांचा आकडा ११ वर

कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी लष्कर विशेष वॉर्ड सुरू करणार. (संग्रहित छायाचित्र)

पुणे-मुंबई या शहरात दुबईहून आलेल्या बहुंताश नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर नागपूरमध्ये कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेहून परतलेल्या एकाला कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली असून संबंधित रुग्णावर नागपूरमधील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

राज्यात पुण्यात ८ तर मुंबईत २ कोरोनाग्रस्त रुग्ण : मुख्यमंत्री

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  पुण्यातील नायडू रुग्णालय, मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयाप्रमाणेच नागपूरमध्येही आवश्यक ती यंत्रणा उभारण्यात आली असून याच रुग्णालयात या रुग्णावर उपचार सुरु आहेत. या रुग्णांसह राज्यातील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा आता ११ वर पोहचला आहे. विषेष म्हणजे मागील तीन दिवसांत राज्यातील कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या वाढली आहे.  आकडा वाढत असला तरी कोरोना बाधित रुग्णांची प्रकृती चिंताजनक नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून देखील करण्यात आले आहे.    

पुण्यात कोरोनाच्या साखळीचा विळखा!

देशात आतापर्यंत ६० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातील कोरोनाचा आकडा ११ वर पोहचला असून नागरिकांमध्ये या रोगोची दहशत निर्माण झाल्याचे चित्र आहे. सरकार आणि प्रशासन कोरोनाच्या रुग्णांवर लक्ष ठेवत असून नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षिततेसंदर्भात योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. सर्दी-खोकला १४ दिवसांपेक्षा अधिक काळ असेल तर तात्काळ रुग्णालयात येऊन तपासणी करण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:After Pune and Mumbai US travel history Nagpur person has tested positive for Coronavirus The total number of positive cases in Maharastra rises to 11