पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पोटच्या दोन मुलींचा विहिरीत ढकलून खून, पित्याचाही आत्महत्येचा प्रयत्न

पिंपरीत तरुणाची हत्या

जळगाव जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. पित्यानेच पोटच्या तीन मुलींपैकी दोन मुलींना विहिरीत ढकलून त्यांचा खून केल्याची घटना पिंपळगाव हरेश्वर येथे बुधवारी घडली. मुलींना विहिरीत ढकलल्यानंतर पित्यानेही विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, तो बचावला. तीन मुली व पत्नी गर्भवती असल्याने आर्थिक विवंचना, नैराश्यातून मुलींचा खून केल्याची कबुली पित्याने दिली आहे.

कोरोना संकटात प्रत्येक कुटुंबाला ७५०० रुपये मिळावेतः सोनिया गांधी

तनुश्री विकास ढाकरे (वय १०) व शिवन्या ढाकरे (४) असे खून झालेल्या मुलींची तर विकास सुरेश ढाकरे (३२) असे पित्याचे नाव आहे.

हा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प

पिंपळगाव हरेश्वर येथील विकास सुरेश ढाकरे बुधवारी सकाळी ७:३० वाजता मोठी मुलगी तनुश्री व लहान मुलगी शिवन्या यांना सोबत घेऊन अरविंद शिंदे यांच्या शेतात गेला. शेतातील विहिरीत तुम्हाला कबुतरे दाखवतो, असे सांगत मुलींना विहिरीजवळ घेऊन गेला व दोन्ही मुलींना ५० फूट खोल विहिरीत ढकलून दिले. त्यानंतर स्वत:ही विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, काही नागरिकांनी त्याला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी त्याला अटक केली असून तपास सुरू आहे.

कोरोना: वडिलांचा मृतदेह घेण्यास नकार, तहसिलदाराने केले अंत्यसंस्कार