पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आदित्य ठाकरेंकडून जाता जाता पुणेकरांना 'आफ्टरनून लाईफ'चा टोला!

आदित्य ठाकरे

मुंबईत आता रात्रभर हॉटेलं आणि मॉल्स सुरु ठेवता येणार आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेटच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर जाता जाता आदित्य ठाकरे यांनी पुणेकरांना टोला लगावल्याचे पाहायला मिळाले. पुणेकर 'आफ्टरनून लाईफ' जगतात असे ते म्हणाले.  

मुंबईतील 'नाईट लाईफ'ला मंत्रिमंडळाची मंजुरी, अशी होणार अंमलबजावणी

दुपारी १ ते ४ ही जागरूक पुणेकराची झोपेची वेळ मानली जाते. पुण्यात या वेळेत दुकाने बंद असतात. याची नेहमीच चर्चा देखील होते. सांस्कृतिक पुण्याची संस्कृती आणि मुंबईची संस्कृती हा एक वादविवादचा एक चांगला विषय आहे. पुणेकर आणि मुंबईकर यांच्यातील संवाद तुम्ही जागृकतेनं ऐकला तर अनेकदा ते लक्षात येते. आतापर्यंत आपण पुण्यात दुपारी दुकाने बंद होण्याची चर्चा ऐकली होती. आता मुंबईत रात्रीच्या वेळी हॉटेलं आणि मॉल्स सुरु ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची चर्चा ऐकायला मिळणार आहे.  मुंबई महानगरीत नाइटलाईफ सुरू व्हावे यासाठी गेली काही वर्षांपासून आदित्य ठाकरे  आग्रही होते. 

नाईट लाईफ नसून ही किलिंग नाईट; आशिष शेलारांचे टीकास्त्र

२६ जानेवारीपासून तीन ठिकाणी याचा प्रयोग राबविण्यात येणार आहे. मुंबई नाईट लाईफमध्ये शहरातील मॉल, मिल कंपाऊंड आणि वांद्रे-कुर्ला संकुलाचा काही भाग केवळ याचाच पहिल्या टप्प्यात समावेश आहे. हा प्रयोग रोजगार निर्मितीसाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलाय. नाईट लाईफच्या काळात केवळ वेळेची मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. पण दुकाने आणि इतर आस्थापनांवर राज्य सरकारचे इतर सर्व नियम लागू असतील. गरजेप्रमाणे आवश्यक वाटल्यास कारवाईही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: after maharashtra cabinet approved night life proposal for mumbai Aaditya Thackeray says pune is like afternoon life