पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'शेतकऱ्यांनी रक्ताने लिहिली राज्यपालांना पत्रे'

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर भाजप नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली.

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यासंदर्भात राज्यपालांनी लक्ष घालावे, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी यासंदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. कर्जमाफीसंदर्भातील व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्यांची जवळपास ६० हजार पत्रे घेऊन भाजप नेते राज्यपालांच्या भेटीला गेले होते.  

'शिवसेना-भाजपने पुन्हा एकत्र यावे, आपण मिळून सरकार स्थापन करु'

राज्यपालांच्या भेटीनंतर फडणवीस म्हणाले की,  राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. २५ ते ३० टक्के शेतकरी महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या लाभाला मुकले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन गावातील केवळ २०८ शेतकऱ्यांचाच पहिल्या यादीत समावेश करण्यात आला आहे. काही शेतकऱ्यांनी रक्ताने पत्र लिहून आपली व्यथा मांडली आहे, असेही त्यांनी सांगितले. 

दिल्लीला वाचवायचं असेल तर लष्कराकडे सोपवाः ओवेसी

सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करावा ही मागणी  आम्ही केली आहे, राज्यपालांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली आहे. भाजपचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे नेते समरजित घाटगे यांच्यासह अन्य काही प्रमुख नेत्यांनी राज्यपालांच्या भेटीवेळी उपस्थितीत होते.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:after loan waiver list maharashtra Government devendra fadnavis said 60 thousand letters of farmers given to governor