पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सासऱ्याला मारहाण करून जावयाचा आत्महत्येचा प्रयत्न

प्रातिनिधिक छायाचित्र

पत्नी नांदायला येत नसल्याने जावयाने सासुरवाडीत जाऊन सासऱ्याला मारहाण करून स्वतः विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बीड जिल्ह्यातील सोलापूरवाडीत (ता. आष्टी) घडली. छत्रपती तुकाराम झाडे (३०, रा. आष्टी) असे या जावयाचे नाव आहे.  या प्रकरणी त्याच्याविरोधात अंभोरा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला.

नागपूर हादरले, बलात्कारानंतर आरोपीकडून पीडीतेवर क्रुर कृत्य

छत्रपतीचे पत्नीबरोबर पटत नसल्यामुळे त्याची पत्नी माहेरी वडिलांकडे राहते. छत्रपतीने सासुरवाडीला जाऊन सासरे बबन मुरलीधर थोरवे (५५) आणि मेहुणा आकाश बबन थोरवे यांच्याशी वाद घातला. 'तू माझ्या बायकोला नांदायला का पाठवत नाहीस' असे म्हणत सासरे बबन यांना मारहाण केली. त्यांच्या डोक्यात दगड आणि विटाने मारहाण केली. यानंतर स्वत: विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर सासरे व जावई या दोघांनाही उपस्थितांनी रुग्णालयात दाखल केले.

खंडणीच्या आरोपातून उदयनराजेंसह १२ जणांची मुक्तता