पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजपचाच मुख्यमंत्री होणार, सरोज पांडेंची पुन्हा युतीवर ठिणगी

सरोज पांडे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या नेते, कार्यकर्त्यांना मुख्यमंत्रीपदाबाबत काहीच भाष्य करु नका असे सांगितले असतानाही कोणी ते मनावर घेतल्याचे दिसत नाही. भाजपच्या महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज पांडे यांनी पुन्हा एकदा निवडणुकीनंतर भाजपचाच मुख्यमंत्री होईल, असे म्हटले आहे. त्या नाशिक येथे बोलत होत्या. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेबरोबर युती होईल. पण निवडणुकीनंतर भाजपचाच मुख्यमंत्री होईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पांडे यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

काँग्रेसच्या चांगल्या पदाधिकाऱ्यांना भाजपत घ्या, दानवेंचा सल्ला

यापूर्वीही सरोज पांडे यांनी मुख्यमंत्री भाजपचाच होईल असे म्हटले होते (वाचा- महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचाचः सरोज पांडे) नंतर दोन्ही पक्षातील नेत्यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा करण्याचे सत्रच सुरु झाले होते. त्यामुळे अखेर मुख्यमंत्री फडणवीस आणि ठाकरे यांनी अमित शहांबरोबर 'आमचं ठरलं' आहे. त्यामुळे आमच्या शिवाय कोणीच मुख्यमंत्रीपदाबाबत बोलायचे नाही असे म्हटले होते. त्यानंतर या चर्चेला पुर्णविराम मिळाला असे वाटत असतानाच पुन्हा एकदा सरोज पांडे यांनी यावर भाष्य करत नव्या वादाला तोंड फोडले आहे.

गतवेळी जिंकलेली एकही जागा भाजप सोडणार नाहीः दानवे