पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शपथविधीसाठी येणाऱ्या शेतकरी, सामन्य नागरिकांसाठी मुंबई पोलिसांच्या महत्त्वाच्या सूचना

(Photo by Kunal Patil/Hindustan Times)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली  महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा  शपथविधी सोहळा गुरुवारी सांयकाळी  शिवाजी पार्कवर होणार आहे. तब्बल २० वर्षांनी शिवसेना पक्षाचा मुख्यमंत्री होत आहे. तर  उद्धव ठाकरे हे ठाकरे कुटुंबातले पहिलेच मुख्यमंत्री होणार आहेत. या सोहळ्यासाठी  राजकीय वर्तुळातले मोठे राजकारणी, सेलिब्रिटीज्, महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थिती राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे शेकडो शेतकऱ्यांनाही शपथविधीचं खास निमंत्रण देण्यात आलं आहे. शेतकरी, शिवसैनिक, सामान्य नागरिक मोठ्या संख्येनं शपथविधीसाठी उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या  शेतकरी आणि सामान्य नागरिकांना मुंबई पोलिसांनी महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. 

शपथविधीसाठी मुंबईतले हे रस्ते बंद, या पर्यायी मार्गाचा करा वापर

शिवाजी पार्कवर येणाऱ्या शेतकऱ्यासाठी सूचना 
-  शपथविधीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांनी  सायंकाळी ४.३० वाजता येऊन स्थान ग्रहण करावे. 
- कार्यक्रमासाठी येताना सोबत कोणतेही सामान, बॅग, पिशवी, पाण्याची बाटली, लॅपटॉप बॅग, सुटकेस व इतर वस्तू आणू नये.
-  शेतकऱ्यांनी शिवाजी पार्क गेट क्र. ६ राजा बढे चौक येथील प्रवेशद्वारानं मैदानात प्रवेश करावा तसेच नेमून दिलेल्या जागी बसावे.
- कार्यक्रमाच्या स्थळी रांगेन प्रवेश करावं, पोलिस तपासांत सहकार्य करावे. 
- वाहन पार्किंगनची सोय सेनापती बापट रोड, रेतीबंदर चौपाटी, फाईव्ह गार्डन, माटुंगा, इंडिया बुल्स पार्किंग येथे करण्यात आली आहे.

'नव्या सरकारसाठी सोनियाजींचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन हवे

सामान्य नागरिकांसाठी सूचना 
- शपथविधीसाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांनी  सायंकाळी ४.०० वाजता येऊन स्थान ग्रहण करावे. 
- कार्यक्रमासाठी येताना सोबत कोणतेही सामान, बॅग, पिशवी, पाण्याची बाटली, लॅपटॉप बॅग, सुटकेस व इतर वस्तू आणू नये.
- नागरिकांना  शिवाजी पार्क गेट क्र. ०५ मिनाताई ठाकरे गेट, गेट क्र. ०४ जिमखाना टेनिस कोर्ट,  गेट क्र. ०५ (अ) शिवाजी पार्क खुली व्यायाम शाळा येथून प्रवेश देण्यात येईल. नागरिकांनी याच प्रवेशद्वारानं प्रवेश करावा. 
- कार्यक्रमाच्या स्थळी रांगेन प्रवेश करावं, पोलिस तपासांत सहकार्य करावे. 
- कार्यक्रम स्थळी अथवा आजूबाजूस संशयास्पद  वस्तू आढळल्यास त्याची माहिती तातडीनं पोलिसांना द्यावी. 
- वरिष्ठ नेते, अधिकारी, ज्येष्ठ नागरीक कार्यक्रम स्थळावरून निधून गेल्यानंतर नागरिकांनी कार्यक्रम स्थळावरून प्रस्थान करावे.
- ज्या प्रवेशमार्गानं मैदानात नागरिक आत आले आहेत त्याच मार्गानं कार्यक्रम संपल्यानंतर जायचे आहे.
- कार्यक्रमाच्या ठिकाणी वाहने आणू नये.  वाहन पार्किंगनची सोय सेनापती बापट रोड, रेतीबंदर चौपाटी, फाईव्ह गार्डन, माटुंगा, इंडिया बुल्स पार्किंग येथे करण्यात आली आहे.

बहुजन विकास आघाडीनं महाआघाडीचं संख्याबळ वाढवलं