पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जनआशीर्वाद यात्रेद्वारे आदित्य ठाकरे जळगावकरांशी साधणार संवाद

आदित्य ठाकरे (संग्रहित छायाचित्र)

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या 'जन आशीर्वाद' यात्रेला आजपासून सुरुवात झाली. जळगाव जिल्ह्यातून या यात्रेला सुरुवात झाली आहे. आदित्य ठाकरेंचे यांचे जळगावात आगमन होताच शिवसैनिक, युवासैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारांनी शिवसेनेला मतदान केले त्यांचे आभार मानण्यासाठी आणि ज्यांनी शिवसेनेला मतदान केले नाही त्यांची मन जिंकण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी आदित्य ठाकरेची ही जन आशीर्वाद यात्रा असणार आहे. 

'चांद्रयान २'च्या प्रक्षेपणाची नवी तारीख जाहीर

जळगावच्या किसनजीनगरमधील प्रसिद्ध गणपती मंदिरात आदित्य ठाकरे यांनी पूजा केली. त्यानंतर इथूनच या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. जळगाव ग्रामीण-धरणगाव, पाचोरा, एरंडोल, चोपडा आणि अमळनेर या पाच विधानसभा क्षेत्रांत आज ही जन आशीर्वाद यात्रा जाणार आहे. या दरम्यान, आदित्य ठाकरे युवापिढी तसेच समाजातील प्रत्येक घटकाशी संवाद साधणार आहेत. 

अयोध्याप्रकरणी मध्यस्थ समितीला अहवाल सादर करण्यास मुदतवाढ

आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा ही सहा टप्प्यांमध्ये होणार आहे. आजपासून सुरु होणाऱ्या या जनआशीर्वाद यात्रेचा पहिला टप्पा २२ जुलै रोजी संपणार आहे. आज ते जळगावमध्ये संवाद साधणार आहेत. त्यानंतर १९ तारखेला धुळे-मालेगाव, २० तारखेला नाशिक शहर, २१ तारखेला नाशिक ग्रामीण, अहमदनगर आणि २२ तारखेला अहमदनगर, श्रीरामपूर आणि शिर्डी येथील युवापिढी आणि जनतेशी संवाद साधणार आहेत.

'काँग्रेसमुक्त महाराष्ट्र'लाच प्राधान्य - चंद्रकांत पाटील