पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जावेद अख्तर- शबाना आझमीच्या गाडीला मुंबई- एक्स्प्रेसवेवर अपघात

शबाना आझमीच्या गाडीला मुंबई- एक्स्प्रेसवेवर अपघात

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मुंबई- एक्स्प्रेसवेवर खालापूर  टोलनाक्याजवळ हा अपघात झाला असल्याचं समजत आहे. या अपघातात शबाना आझमी जखमी झाल्या असल्याचं समजत आहे. उपचारांसाठी शबाना आझमी यांना पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

'...तर राहुल गांधींना सर्वात आधी अंदमानच्या तुरुंगात पाठवावे लागेल'

दुपारी चारच्या दरम्यान हा अपघात झाला. शबाना आझमी- जावेद अख्तर यांच्या गाडीचंही यात मोठं नुकसान झाल्याचं समजत आहे. अपघातावेळी जावेद अख्तरही कारमध्येच होते सुदैवानं त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. शबाना यांच्या कारची ट्रकवर मागून धडक बसल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती स्थानिक वृत्तपत्रांच्या संकेतस्थळांनी दिली आहे. 

'इतिहासावर चर्चा करण्यापेक्षा आताच्या विषयांवर चर्चा करा'

जावेद अख्तर यांच्या ७५ व्या  वाढदिवसानिमित्तानं  एका कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमासाठी ते पुण्यात जात होते असंही समजतंय.