पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कऱ्हे घाटात भीषण अपघात, तीन तरुणांचा मृत्यू

कऱ्हे घाटात भीषण अपघात, तीन तरुणांचा मृत्यू

शिर्डी-नाशिक-पुणे महामार्गावर कारने ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन युवकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना पहाटेच्या सुमारास कऱ्हे घाटात घडली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

भरधाव कंटेनर पोलिसांच्या तंबूत घुसला; दोन ठार, एक जखमी

गुरुवारी पहाटेच्या सुमारास कऱ्हे घाटात भरधाव असलेल्या कारने ट्रकला पाठीमागून धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, कारचा चेंदामेंदा झाला होता. कारमधील तिन्ही युवकांना त्वरीत रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. तिन्ही तरुण संगमनेर तालुक्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येते. 

दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यातही आज पहाटे असाच अपघात घडला. यात एक पोलिस कर्मचारी आणि होमगार्डचा जागीच मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला. भरधाव कंटेनर तपासणीसाठी उभारण्यात आलेल्या पोलिसांच्या तंबूत घुसल्याने हा अपघात झाला.