पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जळगाव जिल्ह्यात भीषण अपघात; डंपर-क्रूझरच्या धडकेत १० ठार

ब्रेकिंग न्यूज

जळगाव जिल्ह्यात डंपर आणि क्रूझरच्या धडकेत एकाच कुटुंबातील १० जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात यावल-फैजपूर रस्त्यावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. अपघातात ७ जण जखमी झाले आहेत.  

'अखेरच्या श्वासापर्यंत उपलब्ध कायदेशीर पर्याय वापरण्याचा अधिकार'

यावल-फैजपूर रस्त्यावर रविवारी मध्यरात्री राख घेऊन जात असलेल्या भरधाव डंपरची समोरुन येणाऱ्या क्रूझरला जोरात धडक बसली. डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्याचे बोलले जाते. ही धडक इतकी भीषण होती की, क्रूझरचा अक्षरशः चुराडा झाला होता. क्रूझरमध्ये चौधरी आणि महाजन परिवारातील सदस्य असल्याचे सांगण्यात येते. यात क्रुझरमधील १० जणांचा मृत्यू तर ७ जण जखमी झाले आहेत. काहींचा जागीच तर काहींचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपचारासाठी रुग्णालयात