पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देवेंद्र फडणवीस यांच्या त्या विधानावर आदित्य ठाकरेंचे उत्तर

आदित्य ठाकरे मूल्यदर तक्ते बघताना (फोटो - ट्विटर हँडलवरून साभार)

शिवसेनेने बांगड्या भरल्या असतील पण आम्ही नाही, असे विधान करणारे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बुधवारी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या विधानबद्दल माफी मागावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.

'दहशतवादी घाबरलेत म्हणूनच बालाकोटनंतर मोठा हल्ला नाही'

देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईत एका जाहीर सभेत बोलताना राज्यातील शिवसेनेच्या नेतृत्त्वाखालील सरकारवर टीका केली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेनेने बांगड्या भरल्या असतील पण आम्ही नाही, असे विधान केले होते. त्याला उत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, शक्यतो मी काही विधानांना उत्तर देणे टाळतो. पण देवेंद्र फडणवीस यांनी बांगड्यांच्या त्या विधानावरून माफी मागितली पाहिजे. कणखर असलेल्या महिला बांगड्या घालतात. राजकारण आपल्या पद्धतीने पुढे चालत राहिल. पण टीका करण्याची पद्धत बदलली पाहिजे. एका माजी मुख्यमंत्र्यांकडून असे विधान अपेक्षित नाही.

पुण्यात वाहतूक पोलिसांनी दुचाकीस्वाराकडून वसुल केला ४२ हजारांचा दंड

आदित्य ठाकरे यांच्या या ट्विटवर अद्याप देवेंद्र फडणवीस यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेने बांगड्या भरल्या असतील. पण आम्ही नाही भरल्या असे वक्तव्य केले होते.