पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आईसमोरच विहिरीत उडी घेऊन मुलाची आत्महत्या

आत्महत्या (प्रतिकात्मक छायाचित्र)

जळगाव जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली. एका तरुणाने दारुच्या नशेत आईसमोर विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. या तरुणाने आत्महत्या का केली हे आणखी समजू शकलेले नाही. जितेन सुकराम ठाकूर (२५, मूळ रा. चिरिया, मध्य प्रदेश) असे मृत तरुणाचे नाव आहे. 

शिवसेनेऐवजी ठाकरेसेना नाव करा आणि बघा..., उदयनराजे कडाडले

जितेन हा कडगाव (ता. जळगाव) येथील एका शेतात गेल्या १५ वर्षांपासून आई व भाऊ यांच्यासोबत राहत होता. याच शेतात त्यांचे कुटुंब मजुरीचे काम करते. रविवारी सुटीचा दिवस असल्याने शेताच्या मालकांनी सर्वांचे पगार दिले होते. त्यानंतर सायंकाळी जितेन हा दारू पिऊन घरी आला. त्यावेळी त्याची आई घरासमोर बसलेली असताना जितेन मोबाइलवर बोलत विहिरीकडे गेला. काही क्षणात त्याने विहिरीत उडी घेतली. 

अभ्यासाच्या ताणामुळे अकरावीतील मुलीची आत्महत्या

आईच्या लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरड केली. सोमवारी सकाळी आठ वाजता जितेनचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. डोक्यास गंभीर दुखापत झालेली असल्याने त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी नशिराबाद पोलिस तपास करत आहेत.

हीच ती वेळ!, शिवसेनेच्या हँडलवरील ते टि्वट तेवढं अनपिन करा