पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

औरंगाबाद: तब्बल ६ तासांनंतर वनविभागाला यश, बिबट्या जेरबंद

औरंगाबाद शहरात बिबट्या

जंगल सोडून औद्योगिक शहर असलेल्या औरंगाबादमध्ये बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली होती. गेल्या सहा तासांपासून औरंगाबादकरांची झोप उडवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभाग आणि पोलिसांना अखेर यश आले. रहिवासी भागात घुसलेल्या बिबट्याला बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन वनविभागाने सकाळपासून सुरु असलेला थरार संपुष्टात आणला. 

औरंगाबाद शहरातील सिडको एन १ या भागात हा बिबट्या आढळून आला होता. रहिवासी भागात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. याची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु सकाळापासून सुरु होते.

दोन पत्नींसह नवऱ्याने आठव्या मजल्यावरून उडी मारली

तत्पूर्वी, औरंगाबाद शहरातील सिडको एन १ हा भाग गजबजलेला भाग आहे. येथील काळा गणपती मंदिर परिसरात बिबट्या आढळून आला.  बिबट्याने एका बंगल्याच्या आवारात आश्रय घेतला होता.

नासाने चांद्रयान-२ च्या विक्रम लँडरला शोधले, छायाचित्र केले जारी

बिबट्याला पकडण्यासाठी संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला होता.