पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बस-रिक्षा विहिरीत कोसळली, मुलगी पाहण्यास आलेल्या कुटुंबातील ८ जणांसह २५ ठार

बस-रिक्षा विहिरीत कोसळली, मुलगी पाहण्यास आलेल्या कुटुंबातील ८ जणांसह २३ ठार (ANI)

सौंदाणे-देवळा रस्त्यावरील मेशी फाट्यालगत भरधाव एस.टी. बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने अ‍ॅपे रिक्षाला धडक देत ही दोन्ही वाहने रस्त्यालगत असलेल्या ५५ फूट खोल विहिरीत कोसळल्याने २५ प्रवासी ठार झाले. यात मुंबईहून मुलगी पाहण्यासाठी आलेल्या अ‍ॅपे रिक्षातील एकाच कुटुंबातील आठ जणांचा समावेश आहे. मृतांमध्ये बसमधील १४ तर अ‍ॅपेतील ९ प्रवाशांचा समावेश आहे. अपघातातील ३२ जखमींवर उपचार सुरू आहेत. २३ मृतांपैकी १९ जणांची ओळख पटली आहे. दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांनी मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर जखमींवर मोफत उपचार केले जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

अधिक माहिती अशी की, कळवण आगाराची धुळे-कळवण बस (एमएच ०६, सी ८४२८) मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास मेशी फाट्याजवळ आली असता बसचे टायर फुटल्याने ती समोरून येणाऱ्या अ‍ॅपे रिक्षावर (एमएच १५ डीसी ४२३३) आदळून रिक्षासह रस्त्यापासून ५० फूट दूर असलेल्या असलेल्या विहिरीत कोसळली.

पाकिस्तानला १० दिवसांत हरवू शकतोः PM मोदी

त्यावेळी आजूबाजूचे शेतकरी मदतीला धावून आले. बसची मागील काच फोडून दोरखंड आणून कार्यकर्ते बसमध्ये उतरले. जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. देवळा, मालेगाव, उमराणे येथून आलेल्या रुग्णवाहिकांनी जखमींना तातडीने मालेगाव, देवळा, उमराणे ग्रामीण रुग्णालयात तर मृतदेह देवळा येथे पाठविण्यात आले. येसगाव येथील अ‍ॅपे रिक्षा रात्री ८ वाजता क्रेनच्या सहाय्याने विहिरीतून बाहेर काढण्यात आली.

देशविरोधी भाषण करणाऱ्या शरजीलला बिहारमधून अटक

मुंबईत पोलिस दलात कार्यरत शकील मन्सुरी यांची पत्नी, नातेवाईक व चालक असे ९ जण अ‍ॅपेने देवळाहून मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आटोपून येसगावकडे जात होते. मात्र, रिक्षा चालकासह एकाच कुटुंबातील ८ जणांपैकी कुणीच वाचले नाही.

१९ मृतदेहांची ओळख पटली असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे : प्रकाश शंकर बच्छाव (धिंडी, कळवण, बस चालक), कुर्बान दादाभाई मन्सुरी (कंरजगव्हाण), सरलाबाई युवराज अहिरे (जिरवाडी, कळवण), अलका धोंडीराम मोरे (खर्डा, देवळा), चंद्रभागा उगले (सटवाईवाडी, देवळा), अन्सार अब्दुल रहेमान मन्सुरी (सटाणा), अंजना शिवराम झाडे (दोडी, सिन्नर), रघुनाथ पांडुरंग मेतकर (देवळा), कृष्णा संपत निकम (वाखारवाडी,देवळा), कल्पना योगेश वनसे (निंबायती, मालेगाव), रिद्धी योगेश वनसे (वय ७, निंबायती), ज्ञानेश्वर शांतीलाल सूर्यवंशी (येसगाव, मालेगाव), अजीम नत्थू मन्सुरी (येसगाव), शाहान अन्सार मन्सुरी (सटाणा), हजराबी अजीम मन्सुरी (येसगाव), शाहिस्ता शकील मन्सुरी (नांदगाव), शिवाजी रुपल गावित (रा.नाळीद, कळवण), बाळासाहेब चिंधा निकम (शिरसमणी, कळवण), शांताराम चिंधा निकम (शिरसमणी, कळवण).

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:A bus and a rickshaw fell into a well after ramming into each other in Deola area of Nashik 23 dead 32 injured