पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रमपत्रिका आज जाहीर करण्यात आली आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष नीतीन तावडे यांनी मराठवाडा साहित्य परिषदेत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत कार्यक्रमपत्रिका जाहीर केली. उस्मानाबाद येथे १० जानेवारीपासून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली हे साहित्य संमेलन होणार आहे.

 

हेमंत सोरेन यांच्या शपथविधी सोहळ्याला 'हे' दिग्गज नेते राहणार

साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी पद्मश्री ना. धों. महानोर हे करणार असून समारोपात प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कथा - कादंबरीकार प्राचार्य रा. रं. बोराडे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. संमेलनात वाङ्मयीन व सामाजिक प्रश्नांवर पाच परिसंवाद, श्रीमती प्रतिभा रानडे यांची प्रकट मुलाखत, निमंत्रित कवींची दोन कविसंमेलने, कथाकथन, महात्मा ज्योतीराव फुले यांच्या शेतक-याचा असूड' या ग्रंथावर अभ्यासकांची परिचर्चा तसेच आजच्या पाच लक्षवेधी कथाकारांशी  अरविंद जगताप व राम जगताप यांचा प्रकट संवाद, बालसाहित्यिकांचा मुलांशी संवाद साधणारा ‘बालमेळावा', बालाजी सुतार यांच्या गावकथा' या नाटकाचा प्रयोग आणि दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रम आखले आहेत.

घाटकोपर: खैरानी रोडवर लाकडाच्या कारखान्याला भीषण आग

तसंच, ज्येष्ठ कथाकार भास्कर चंदनशिव, दिल्ली येथे चहा विकून चरितार्थ चालवणारे मूळ अमरावती जिल्ह्यातील मान्यवर मराठी भाषक हिंदी साहित्यिक लक्ष्मणराव (चहावाले) आणि श्रीरामपूरच्या 'शब्दालय प्रकाशना'च्या प्रकाशक सुमती लांडे यांचा त्यांनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या लक्षणीय कामगिरीबद्दल संमेलनात जाहीर सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय मराठवाड्यातील कवींचे ‘आमचे कवी : आमची कविता' असे एक स्वतंत्र कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.

'सत्ता आणि खुर्चीने शिवसेनेच्या तोंडाला टाळे लावले'

संमेलनस्थळाला संत गोरोबा काका नगरी असे नाव देण्यात आले आहे. तर कार्यक्रमांसाठी उभारलेल्या मंडपांना उस्मानाबाद जिल्ह्यातील सुपुत्र शाहीर अमरशेख, देविसिंग चौहान आणि दत्तो आप्पाजी तुळजापूरकर अशी नावे देण्यात आलेली आहेत. तरी, रसिकांनी संमेलनाला येण्याचे आणि कार्यक्रमांचा व पुस्तके खरेदीचा आनंद घेण्याचे आवाहन साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष नीतीन तावडे यांनी मराठीप्रेमी व वाङ्मयप्रेमी रसिकांना केले आहे.

२५ दिवसांतच दोन मंत्र्यांच्या बंगल्यात बदल