पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'खास होणार, हमखास होणार, आपलं संमेलन झकास होणार'

सायकल फेरीसह उत्साहपूर्ण घोषणांनी दणाणले उस्मानाबाद शहर

''खास होणार, हमखास होणार, आपलं संमेलन झकास होणार'' अशा उत्साहपूर्ण आणि गगनभेदी घोषणा देत विद्येचे माहेरघर पुणे येथून उस्मानाबादपर्यंत साहित्य संमेलनाच्या प्रचार आणि प्रसारसाठी सायकलवरुन प्रवास करणार्‍या प्रथमेश तुगावकर या साहित्यप्रेमी तरुणाचे उस्मानाबादकरांनी जोरदार स्वागत केले. तर शहरातील प्रमुख मार्गावरुन भव्य सायकल फेरी काढून साहित्य संमेलनात जास्तीत जास्त साहित्यप्रेमी नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. सायकल फेरीमध्ये उस्मानाबाद शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

लातूरमध्ये भाजपला धक्का, काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे महापौर

उस्मानाबाद येथे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जानेवारी 2020 मध्ये होत आहे. या संमेलनाच्या प्रसारासाठी मूळचा उस्मानाबाद येथील व नोकरीनिमित्त मुंबई येथे वास्तव्यास असलेले प्रथमेश तुगावकर यांनी पुणे ते उस्मानाबाद सायकल प्रवास केला. शुक्रवार, 22 नोव्हेंबर रोजी सकाळी ते उस्मानाबाद शहरात दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी उस्मानाबाद शहरातील सायकलपटूंसह विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यप्रेमी पुरूष, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील शिंगोली विश्रामगृहाजवळ तुगावकर यांचे उस्मानाबादकरांच्या वतीने नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी स्वागत केले.

शरद पवारांनी राजकारणातील चाणक्यावर केली मात, राष्ट्रवादीचा भाजपला टोला

खास होणार, हमखास होणार, आपलं संमेलन झकास होणार अशा गगनभेदी घोषणा देत छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या एनसीसीच्या 50 कॅडेट्सनी देखील या सायकल फेरीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. संमेलनाच्या बोधचिन्हाचे टीशर्ट आणि संमेलन ध्वज सायकलला लावून निघालेल्या या फेरीने उस्मानाबादकरांचे लक्ष वेधून घेतले. शिंगोली विश्रामगृहापासून औद्योगिक वसाहत, ज्ञानेश्वर मंदिर, महात्मा बसवेश्वर चौक, राम नगर, आनंद नगर, समता नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, ताजमहल टॉकीज, काळा मारुती चौक, आर्य समाज चौक या मार्गावरुन या फेरीचा साहित्य संमेलन संपर्क कार्यालयात समारोप करण्यात आला. यावेळी संमेलन संयोजन समितीच्या पदाधिकार्‍यांसह शहर आणि परिसरातील साहित्यप्रेमी विद्यार्थी, तरुण, महिला, पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्धव ठाकरेंविरोधात औरंगाबादमधील पोलिस ठाण्यात तक्रार

येडशी येथेही भव्य स्वागत

पुणे येथून सायकलवरुन उस्मानाबादकडे निघालेले प्रथमेश तुगावकर यांचे उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथे साहित्यप्रेमींनी जल्लोषात स्वागत केले. त्यांच्या स्वागतासाठी भल्या पहाटे गावातील प्रतिष्ठित मान्यवरांसह युवकांची मोठी गर्दी झाली होती. तर उस्मानाबाद मॅरेथॉन ग्रुपमधील वीसहून अधिक सायकलपटूंनी येडशी येथून उस्मानाबादपर्यंत तुगावकर यांच्यासोबत सायकल फेरीत सहभाग नोंदविला.

माझं संमेलन माझं कर्तव्य

साहित्य संमेलन आपल्या गावी होत आहे, ही भावनाच मुळात आनंददायी आहे. त्यामुळे या संमेलनात आपलाही सहभाग असावा याकरिता पुणे ते उस्मानाबाद सायकल प्रवास केला. पर्यावरणपूरक, स्वच्छ व हरित उस्मानाबाद असा संकल्प या संमेलनाच्या माध्यमातून राज्यासमोर मांडण्याची संकल्पना घेऊन ही सायकल फेरी काढली होती. हे माझं समेलन आहे आणि ते यशस्वी करणे हे माझे कर्तव्य आहे. त्यानिमित्ताने उस्मानाबाद आणि परिसरातील साहित्य आणि संस्कृती अधिक सकसपणे जगासमोर मांडण्याची संधी उपलब्ध झाली असल्याचे संगणक अभियंता प्रथमेश तुगावकर यांनी यावेळी सांगितले.

सत्ता स्थापनेमध्ये काँग्रेसला 'न्याय' मिळणार का?