पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

साहित्य संमेलनातील सुसज्ज ग्रंथ दालन उभारणीस प्रारंभ

उस्मानाबादः पुस्तकवेड्या रसिकांसाठी पर्वणी, ३०० ग्रंथगाळ्यांची उभारणी

पुस्तक खरेदी करणार्‍या हातांचा परिसर असा लौकिक असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात पहिल्यांदाच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यानिमित्ताने सुसज्ज ग्रंथदालन उभारणीस शनिवारी मोठ्या उत्साहाने सुरुवात करण्यात आली. या संमेलनात पुस्तकवेड्या रसिकांसाठी मोठी पर्वणी राहणार आहे. आधुनिक साधनांचा वापर करुन ३०० ग्रंथगाळे निर्माण करण्याच्या कामाचा शनिवारी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

ना. धों. महानोर यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे होणार उद्घाटन

९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ग्रंथप्रेमींसाठी सुसज्ज असे ग्रंथप्रदर्शन भरविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील प्रतिभावान साहित्यिकांचे ग्रंथ, कादंबरी, आत्मचरित्र, कथा, कवितासंग्रह असे अनेकविध साहित्यप्रकार या ग्रंथप्रदर्शनात वाचकांच्या भेटीला येत आहेत. १० फूट बाय १२ फूट आकाराचे सुसज्ज ग्रंथगाळे तयार केले जात आहेत. दोन गाळ्यांमध्ये १६ फूट आकाराचा रस्ता सोडण्यात येत आहे. या ग्रंथ दालनात वेगवेगळ्या ठिकाणी प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहेत. त्याच्या कामाचा शुभारंभ शनिवारी श्री तुळजाभवानी देवी आणि संत गोरोबा काका यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करुन करण्यात आला.

साहित्य संमेलनासाठी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेकडून ७ लाखाचा निधी

शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मैदानावर हे ग्रंथदालन साकारले जात आहे. सुमारे दोन एकर क्षेत्रावर हे ग्रंथदालन उभारले जात आहे. ८० बाय २०० फूट आकाराचे ३ मोठे मंडप उभारले जाणार आहेत. त्या मंडपात पुस्तक विक्रेते तसेच खरेदीसाठी येणार्‍या रसिकांसाठी विविध सोयीसुविधा पुरविल्या जाणार आहेत. ग्रंथ विक्रेत्यांसाठी पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था, दोन टेबल, दोन खुर्च्या, एक चार्जिंग पॉइन्ट पुरविला जाणार आहे. एका संस्थेला अथवा विक्रेत्याला एका ठिकाणी केवळ चार गाळ्यांची नोंदणी करता येणार आहे. प्रतिगाळा दोन व्यक्तींचे भोजन आणि निवासाची व्यवस्था संयोजन समितीतर्फे करण्यात आली आहे. त्याकरिता ग्रंथगाळ्यांचे भाडे व इतर सोयीसुविधांपोटी प्रतिगाळा ६५०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. शनिवारी आमदार पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात ग्रंथदालन उभारणीस सुरुवात करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नीतीन काळे, ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव, स्वागताध्यक्ष नितीन तावडे, कार्यवाह रवींद्र केसकर, कोषाध्यक्ष माधव इंगळे, सहकार्यवाह प्रशांत पाटील, सतीश दंडनाईक, नगरसेवक युवराज नळे, कार्यकारिणी सदस्य अग्निवेश शिंदे, राजेंद्र अत्रे,बालाजी तांबे, इलियास पीरजादे, मीना महामुनी, कमल नलावडे यांच्यासह साहित्य संमेलन संयोजन समितीचे पदाधिकारी, सदस्य व साहित्यप्रेमी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

'खास होणार, हमखास होणार, आपलं संमेलन झकास होणार'