पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अहमदनगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू

अहमदनगरमध्ये गणपतीची आरती करुन घरी जाणाऱ्या ९ वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील कुरणपूर येथे ही घटना घडली आहे. दर्शन चंद्रकांत देठे असं या मृत मुलाचे नाव आहे. त्याच्या मृत्यूमुळे देठे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

पेट्रोल-डिझेलवरील गाड्यांवर बंदीचा विचार नाही - गडकरी

कुरणपूरच्या देठे वस्तीजवळ गणपतीची आरती करुन दर्शन काकूसोबत घरी जात होता. त्याचवेळी रस्त्याच्या शेजारी दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप टाकली आणि त्याला शेजारच्या शेतामध्ये घेऊन गेला. दर्शनच्या काकूने आरडा ओरडा करत शेजारी असलेल्या नागरिकांची मदत मागितली. यावेळी शेतामध्ये जाऊन नागरिकांनी दर्शनला बाहेर काढले.  बिबट्याच्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. 

चिदंबरम यांना धक्का, अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला

जखमी अवस्थेमध्ये दर्शनला ताबडतोब लोणी येथील रुग्णालयात घेऊन गेले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे कुरणपूर येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या आधी देखील या परिसरामध्ये नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले होते. या बिबट्याला ताबडतोब जेरबंद करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

कोहिनूर मिल प्रकरण: ईडीकडून नितीन सरदेसाई यांची चौकशी