पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सांगलीतील ब्रह्मनाळ येथे बोट उलटली; १२ जणांचा मृत्यू

सांगली महापूर

सांगली जिल्ह्यामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. पूरामध्ये अडकलेल्यांना घेऊन जाणारी बोट उलटली. यामध्ये १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर १२ ते १५ जण बुडाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बोटीमधून २७ ते ३० पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत होते.

सांगली जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यातल्या ब्रह्मनाळ गावाजवळ ही घटना घडली आहे. ब्रम्हनाळ गावाला पूराचा फटका बसला आहे. पूरामध्ये अडकलेल्या या गावातील लोकांच्या बचावासाठी एक खासगी बोट गेली होती. या बोटीमधून पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत असताना कृष्णा नदीच्या पूरामध्ये बोट उलटली. या बोटीमध्ये २७ ते ३० जण होते. त्यामधील १२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर १२ ते १५ जण बुडाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, घटनास्थळावर एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. बचावकार्याला सुरुवात झाली आहे.