पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ८९ वर, रविवारी आढळले १५ नवे रुग्ण

आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करत असूनही यावर नियंत्रण मिळवणे दिवसेंदिवस कठीण जाताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशभरात 'जनता कर्फ्यू'चे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला होता. दरम्यान, राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. राज्यात रविवारी कोरोना विषाणूचे १५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांनी शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वीचे जे कोरोना विषाणूचे रुग्ण होते. त्यांचे निकटवर्तीयच नवे रुग्ण आहेत, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. हा विषाणू समाजात पसरलेला नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन ही त्यांनी केली आहे.

बेपत्ता होम क्वारंटाइन लोकांना पुणे पोलिसांचा इशारा

नव्या १५ कोरोना विषाणू पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये १४ जण मुंबईतील तर १ जण पुण्यातील असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. यापूर्वी ज्या रुग्णांना याची लागण झालेली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे ते म्हणाले. नागरिकांनी आता जास्त काळजी घेण्याची गरज आहे. लोकांनी गर्दी करु नये. राज्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. विनाकारण घराबाहेर पडू नका. बहुतांश रुग्ण हे सामान्य आहेत. त्यातील फक्त काहीजणच आयसीयूमध्ये आहेत. त्यामुळे घाबरुन जाऊ नका, असे ते म्हणाले. 

दरम्यान, कोरोनाची लक्षणे आढळल्यानं कस्तूरबा रुग्णालयात तपासणीसाठी गेलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीस रुग्णलयातील डॉक्टरांनी औषधं देऊन परत पाठवलं. मात्र काही दिवसांत तब्येत खालावल्यानं संबधित व्यक्तीची खासगी रुग्णालयात कोरोना चाचणी करण्यात आली ही चाचणी  पॉझिटिव्ह निघाल्यानं खळबळ उडाली आहे.

मुंबई-पुणे येथे कोरोना तपासणी केंद्रांना मान्यता

सध्या राज्यात कोरोना विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळले आहेत ते  परदेशातून प्रवास करुन आले आहेत किंवा ज्यांना कोरोना झाला आहे अशाच व्यक्तींच्या  संपर्कात आले आहेत.  त्यामुळे अशा व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांच्या प्राधान्यानं कोरोना चाचण्या केल्या जात आहेत.