पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सांगलीमध्ये कारागिरानेच चोरलं सव्वा किलो सोनं

सांगली पोलिस

सांगलीमध्ये सराफाच्या दुकानात मोठी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. सव्वा किलो सोन्याचे दागिने घेऊन आरोपी फरार झाला आहे. हा आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून सोन्याच्या दुकानामध्ये काम करणारा कारागिर आहे. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात कारागिराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

युतीचा फॉर्म्युला ठरलाय, दोन दिवसांत कळवूः उद्धव ठाकरे

सांगली शहरातील सराफ बाजारामध्ये संतोष नार्वेकर यांचे सराफ दुकान आहे. त्याच्या इथे पश्चिम बंगाल येथे राहणारा गुलाम शेख हा कारागीर होता. गेल्या सात वर्षापासून तो त्यांच्याकडे काम करत होता. गुलाम शेख प्रामाणिकपणे काम करत असल्याने संतोष नार्वेकर यांनी दुकान आणि कपाटाच्या चाव्या त्याच्याकडेच दिल्या होता. सोमवारी मध्यरात्री शेखने दुकानामध्ये कोणी नसल्याचा फायदा घेत सव्वा किलो सोने घेऊन फरार झाला.

मनसे निवडणूक लढण्याची शक्यता, राज ठाकरे घेणार अंतिम

या दीड किलो सोन्याची किंमत तब्बल ८४ लाख ऐवढी आहे. संतोष नारेवकर मंगळवारी दुकानामध्ये गेले असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी गुलाम शेख याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र तो सापडत नसल्याने अखेर त्यांनी गुरुवारी रात्री गुलाम शेख याच्याविरोधात सोने चोरी केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. संतोष नार्वेकरांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुलाम शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. दरम्यान, गुलाम शेख यांच्या शोध घेण्यासाठी पोलिस पश्चिम बंगालला त्याच्या मूळ गावी जाणार आहेत. 

पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त पद्मनाभन यांची बदली