राज्यात कोरोना विषाणू संसर्गित रुग्णांची संख्या वाढतेच आहे. गुरुवारी राज्यात कोरोनाचे आणखी ८१ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४१६ वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत राज्यात १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने गुरुवारी दिली.
Out of the 81 fresh COVID19 cases, 57 have been reported in Mumbai. Till now, 42 people have been discharged: Maharashtra Health Department https://t.co/Ks7IUX2vtF
— ANI (@ANI) April 2, 2020
राजकारण बाजूला ठेवून राष्ट्रहिताचा विचार करा, शहांचा काँग्रेसवर पलटवार
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 'राज्यात कोरोनाचे ८१ नवे रुग्ण आढळले आहेत. यामधील सर्वाधिक ५७ रुग्ण हे मुंबईतील आहेत. तर पुण्यामध्ये ६, पिंपरी-चिंचवडमध्ये ३, अहमदनगरमध्ये ९, ठाण्यामध्ये ५ आणि बुलढाण्यामध्ये एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४१६ वर पोहचला आहे. महत्वाचे म्हणजे राज्यातील ४२ कोरोनाबाधित रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
राज्यातील ३० शासकीय रुग्णालये 'कोविड-१९ रुग्णालय' म्हणून घोषीत
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोविड-१९ रुग्णालये म्हणून घोषीत केली आहेत. या रुग्णालयांमध्ये २३०५ खाटा उपलब्ध असणार आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाऊन लागू केला आहे. लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडू नका, असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे.
कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या भागांत एँटिबॉडी टेस्ट घ्या, ICMR चे निर्देश