पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आठ वर्षांच्या मुलीची कमाल, पूरग्रस्तांनी केली अमूल्य मदत!

कार्तिकीने पूरग्रस्तांसाठी केली मदत

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी आतापर्यंत अनेकांनी आपापल्या परिने मदत केली आहे. पण या भागातील पूरग्रस्तांसाठी ठाण्यातील एका आठ वर्षांच्या मुलीने केलेल्या मदतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्तिकी चव्हाण नावाच्या या मुलीने तिला विविध स्पर्धांमध्ये मिळालेले रोख बक्षिसाचे पैसे आणि आई-वडिलांनी खाऊसाठी दिलेले पैसे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिले आहेत. एकूण दोन हजार रुपयांची रक्कम नुकतीच तिने ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली.

मुंबईत शालेय बससाठी लवकरच खास सुविधा, विद्यार्थी सुरक्षेचा विचार

कार्तिकी चव्हाण हिचे वडील किरणकुमार चव्हाण हे सांगली-कोल्हापूरमधील पूरग्रस्तांसाठी मदतीच्या वस्तूंची पाकिटे तयार करीत असल्याचे तिने पाहिले. याबद्दल उत्सुकता वाटल्यावर तिने आईकडे त्याबद्दल विचारणा केली. आईने तिला सांगली आणि कोल्हापूरमध्ये काय घडले आहे, याची कल्पना दिली. काय घडलंय हे समजल्यावर तिने स्वतः पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचा निर्णय घेतला. शाळेत आणि सोसायटीमध्ये विविध स्पर्धांमध्ये मिळालेले रोख बक्षिस आणि आई-बाबांनी खाऊसाठी दिलेले पैसे कार्तिकीने साठवले होते. ही रक्कम दोन हजार रुपयांच्या घरात होती. ती सर्व तिने पूरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला. 

कार्तिकी म्हणाली, पूराच्या पाण्यामुळे अनेकांच्या वस्तू पाण्यात वाहून गेल्या असल्याचे मला समजल्यावर मला खूप वाईट वाटले. माझ्यासारख्या मुलांकडे तिथे आता वह्या, पुस्तके, खेळण्याच्या वस्तू काहीही नसल्याचे कळल्यावर मला धक्काच बसला. त्यामुळे मी त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला.

आयफोन ११ सीरिज लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत एका क्लिकवर

कार्तिकीने दिलेली रक्कम आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीकडे देणार आहोत, अशी माहिती ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.