पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा १६७ वर; आणखी ८ रुग्णात वाढ

राज्यात कोरोना विषाणूने कहर माजवला आहे.

राज्यात कोरोनाचा विखळा आणखी घट्ट होत चालला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. अशात राज्यात आणखी ८ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १६७ वर पोहचला आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रायाने शनिवारी ही माहिती दिली आहे.

गुजरातमध्ये कोरोनाने घेतला आणखी एकाचा बळी!

राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 'आज आणखी ८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामधील ७ जण मुंबईचे आहेत. तर एक जण नागपूर येथील आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १६७ झाली आहे.' तर, मुंबईतील ७ रुग्णांमध्ये तीन पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. मुंबईमध्ये शुक्रवारी कोरोनाबाधित रुग्णांची संक्या ८६ होती. आता त्यात वाढ होत मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा ९३ वर पोहचला आहे. 

मोदींनी फोनवरुन थेट नायडू रुग्णालयातील नर्सशी साधला संवाद, अन्...

भारतात कोरोनाबाधित रुग्णांच्या यादीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. तर मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा सर्वात जास्त आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारने २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊन दरम्यान जीवनावश्यक सेवा सुरु राहणार असल्याचे सरकारने सांगितले आहे. लॉकडाऊन दरम्यान सरकारने घरामध्ये थांबा, प्रवास करु नका, गर्दी टाळा असे आदेश दिले आहे. तरी सुद्धा मुंबईतील अनेक नागरिक सरकारच्या नियमांचे उल्लंघन करत आहे.

... म्हणून 'ओला'चे CEO पुढील वर्षभर वेतन घेणार नाहीत

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:8 more people found corona virus positive the total number of positive cases in the state rises to 167