पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू

कोरोना विषाणूबाधित रुग्णावर उपचार सुरु असतानाचे संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत चालला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडा वाढत चालला आहे. सोमवारपेक्षा मंगळवारी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात ३१ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर सोमवारी राज्यात ५२२ नवे रुग्ण आढळले होते. 

अजित पवारांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

आरोग्य विभागाने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एका दिवसात कोरोनाचे आणखी ७२९ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ९ हजार ३१८ वर पोहचला आहे. एका दिवसात १०६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत १ हजार ३८८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात मंगळवारी ३१ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित मृतांचा आकडा ४०० वर पोहचला आहे. 

पाकला अगोदर चीनने वाचवले अन् आता कोरोनाजन्य परिस्थितीनं

मंगळवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ३१ जणांपैकी १६ पुरूष तर १५ महिला रुग्णांचा समावेश आहे. ३१ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २० रुग्ण आहेत तर १० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर १ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या ३१ रुग्णांपैकी २० जणांमध्ये (६५%) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

टिकटॉककडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच कोटींची मदत