पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊनः मुले परराज्यात अडकली, ७० वर्षांच्या पत्नीनेच दिला पतीला अग्नी

अंत्यसंस्काराचे संग्रहित छायाचित्र

कोरोना विषाणूच्या थैमानामुळे भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे संपूर्ण भारत स्तब्ध झाला आहे. अचानक लागू करण्यात आलेल्या या लॉकडाऊनमुळे देशभरातील कोट्यवधी लोकांची अडचण झाली आहे. लाखो प्रवासी कामगारांनी कोणत्याही परिस्थितीत आपले गाव गाठण्यासाठी हजारो किमी चालत जाण्याचा पर्याय निवडला आहे. अनेकजण विविध ठिकाणी अडकले आहेत. लॉकडाऊनचा अनेकांना फटका बसला आहे. गुरुवारी सोलापुरात एक विदारक चित्र दिसले. येथील एका ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचे निधन झाले. दुर्देवाने या व्यक्तीची तिन्ही मुले हे उदरनिर्वाहासाठी तेलंगणात राहतात. या मुलांना आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारास लॉकडाऊनमुळे येता आले नाही. अखेरीस ७० वर्षांच्या पत्नीलाच पतीच्या चितेला अग्नी देण्याची वेळ आली. 

मोदींच्या आवाहनावर आव्हाड-मलिकांची टीका तर रोहित पवारांकडून स्वागत

सोलापूर शहरातील तेलुगु नाभिक समाजातील ज्येष्ठ नागरिक व्यंकटय्या राजमल्लू वोद्धूल यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले. लॉकडाऊनमुळे त्यांची तिन्ही मुले तेलंगणच्या करीमनगर येथे अडकून पडलेली. बुधवारी सायंकाळीच मुलांना ही माहिती देण्यात आली. परंतु त्यांना सोलापूरला येणे शक्य नव्हते. शेवटी ७० वर्षांच्या पत्नी श्यामलव्वा यांच्या हातूनच अग्नी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

रामायण, महाभारतासह डिस्कवरी ऑफ इंडियाही दाखवा, काँग्रेसची मागणी

गुरुवारी सकाळी अंत्ययात्रा निघाली. शिंकाळे घेऊन श्यामलव्वा पुढे होत्या. मडके घेऊन श्यामलव्वा चितेभोवती फिरल्या. त्यांच्याच हातून अग्नी देण्यात आला.

तबलिग जमातच्या 'त्या' रुग्णांविरोधात रासुका दाखल करा, योगींचे आदेश