पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऊसतोड कामगारांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात; ७ जण ठार

बेळगाव अपघात

बेळगावमध्ये ऊस तोडणीसाठी कामगारांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला भीषण अपघात झाला आहे. ट्रॅक्टर पुलावरुन नाल्यात कोसळला. या अपघातामध्ये ७ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर २० जण जखमी झाले आहेत. खानापूर तालुक्यातील बोगुर गावाजवळ ही घटना घडली आहे. अपघाताची माहिती कळताच गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे.  

हिंगणघाट प्रकरणातील पीडितेची प्रकृती नाजूक

ऊस तोडणीसाठी कामगारांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास अपघात झाला. चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर पुलावरुन नाल्यात कोसळला. ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या कामगारांच्या अंगावर ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघातामध्ये ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅक्टर चालकाच्या बेजबाबदारपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप जखमी कामगारांनी केला आहे.  

संभाजी भिडे यांच्या विरोधात अटक वॉरंट

अपघाताची माहिती कळताच नंदगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. जखमींवर बेळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातातील मृत आणि जखमी सर्वजण बोगुर गावचे असल्याचे सांगितले जात आहे. अपघातामध्ये सावित्री बाबू थुनीसक्कट्टी, तेंगेवा यल्लाप्पा हंसिक्कट्टी, अशोक फकीरा केदारी, शांतम्मा यल्लप्पा जुंजारी, शांतावा हनुमंता अलागुंडी आणि नागव्वा यशवंत मथोली यांचा मृत्यू झाला आहे. 

पश्चिम रेल्वेवर आज ८ तासांचा ब्लॉक; चर्चगेट-मुंबई सेंट्रल लोकल बंद