पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बीडमध्ये ट्रक-कारचा भीषण अपघात; ७ जणांचा मृत्यू

बीड अपघात

बीडमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव बोलेरो कारने ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातामध्ये ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बीडच्या मांजरसुंभा- पाटोदा रस्त्यावर वैद्यकिन्ही गावाजवळ हा अपघात झाला आहे. 

भविष्यात काँग्रेसने शिवसेनेशी युती करुन निवडणूक लढवायची का?: निरुपम

बीड तालुक्यातील निवडुंगवाडी येथील काही ऊसतोड मजूर, मुकादम बोलेरो कारमधून जात होते. त्याचवेळी वैद्यकिन्ही गावाजवळ भरधाव बोलेरो कारने ट्रकला धडक दिली. अपघातात कारमधील ७ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ४ जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिला आणि एका चिमुकल्याचा समावेश आहे. 

राज्यपालांकडून दुजाभाव, भाजपला ७२ तर आम्हाला फक्त २४ तास

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच बीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. बीड पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरु आहे. अपघातामध्ये वैजनाथ ज्ञानोबा तांदळे,  बाळू पंढरीनाथ मंडे, केसरबाई बन्सी मुंडे आणि अन्य चार जणांचा मृत्यू झाला आहे. 

शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात शरद पवार यांनी केले महत्त्वाचे