पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गडचिरोली पोलिसांना यश; ७ जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

गडचिरोली नक्षलवादी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गडचिरोली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ७ जहाल नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. हे सातही नक्षलवादी नक्षलवाद्यांच्या चातगाव दलामध्ये सक्रिय होते. आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांमध्ये तीन महिला, कमांडर आणि उपकमांडरचा समावेश आहे. नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. या नक्षलवाद्यांवर गडचिरोली पोलिसांनी ३३ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. 

फडणवीसांनी राज्यावर चार लाख कोटींचे कर्ज करून ठेवले - शरद पवार

नक्षल चळवळीत काम करताना होणारी पिळवणूक, कमी होत चाललेला जनाधार, उपासमार या सगळ्याला कंटाळून या जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या नक्षलवादी कारवायांमध्ये या त्यांचा समावेश होता. या नक्षलवाद्यांवर हत्या, जाळपोळ या प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस त्यांचा शोध घेत होते. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी लाखो रुपयांचे बक्षीस देखील जाहीर केले होते. 

फडणवीसांनी राज्यावर चार लाख कोटींचे कर्ज करून ठेवले - शरद पवार

राकेश उर्फ गणेश सनकू आचला (३४ वर्ष), देविदास उर्फ मनिराम सोनू आचला (२५ वर्ष), रेश्मा उर्फ जाई दुलसू कोवाची (१९ वर्ष), अखिला ऊर्फ राधे झुरे (२८ वर्ष), शिवा विज्या कोटावी (२२ वर्ष), करुणा ऊर्फ कुम्मे रामसिंग मडावी (२२ वर्ष), राहुल ऊर्फ दामजी सोमजी पल्लो (२५ वर्ष) अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची नावं आहेत. या वर्षामध्ये गडचिरोली पोलिसांसमोर २३ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणामुळे गडचिरोली पोलिसांना मोठे यश आले आहे. 

लग्नाच्या खरेदीसाठी गेलेल्या डॉक्टर तरुणीचा खड्ड्यांनी घेतला बळी