पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

यवतमाळमध्ये भीषण अपघात; ७ ठार, १५ जखमी

यवतमाळमध्ये भीषण अपघात

यवतमाळ जिल्ह्यातील जोडमोहा गावाजवळील वाढोणा खुर्द येथे व्हॅनला भीषण अपघात झाला. यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले आहेत. रविवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. नातेवाईकाचे अस्थिविसर्जन उरकून परतत असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींवर यवतमाळ येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. 

जोडमोहा येथील बाबाराव वानखेडे यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या अस्थिविसर्जनासाठी त्यांचे नातेवाईक वर्धा जिल्ह्यातील कोटेश्वर येथे गेले होते. त्याठिकाणावरुन परत येत असताना हा अपघात झाला. वाढोणा गावजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव व्हॅन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली. त्यानंतर व्हॅन रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळली. 

आग्रा एक्स्प्रेस वेवर ट्रक-व्हॅनमध्ये भीषण अपघात, ७ जण जिवंत जळाले

या भीषण अपघातामध्ये महादेव बावनकर, किसन कळसकर, महादेव चंदनकर, गणेश चिंचोलकर, अमर आत्राम यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या दोघांचा उपाचारा दरम्यान मृत्यू झाला.या दोघांची नावं अद्याप समजू शकली नाहीत. तर जखमी झालेल्या १५ जणांना तात्काळ यवतमाळ येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.