पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोल्हापूरात सापडले ६९ गावठी बॉम्ब; दोघांना अटक

कोल्हापूरात गावठी बॉम्ब सापडले

कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. हातकणंगले तालुक्यातील माले मुडशिंगी इथे ६९ गावठी बॉम्ब सापडले आहेत. या घटनेमुळे माले मुडशिंगी परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कारवाई करत हे बॉम्ब जप्त केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विलास जाधव आणि आनंद जाधव अशी अटक केलेल्या व्यक्तींची नावं आहेत. 

आरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड

आरोपींच्या घरातून ६९ गावठी बॉम्ब आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य असा सात हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. चौकशी दरम्यान रानडुक्करांच्या शिकारीसाठी हे गावठी बॉम्ब बनवल्याची माहिती आरोपींनी दिली. उजळाईवाडी उड्डाणपुलाखालील स्फोटाचा तपास करत असताना पोलिसांना हा बॉम्बसाठा सापडला आहे. दरम्यान उजळाईवाडीमध्ये झालेल्या स्फोटाचे धागेदोरे या प्रकरणाशी आहेत का? याचाही तपास पोलिस करत आहेत.

गेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा?