पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विदर्भातील ६० टक्के शेतकऱ्यांना मानसिक आजार, सर्वेक्षणाचे निष्कर्ष

शेतकरी (संग्रहित छायाचित्र)

विदर्भातील ६० टक्के शेतकऱ्यांना मानसिक उपचारांची गरज असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सने हे संशोधन केले. त्याचे निष्कर्ष सगळ्यांनाच धक्का देणारे आहेत. विदर्भातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्यासाठी तज्ज्ञांची आणि प्रशिक्षितांची नियुक्ती सरकारने करावी, असेही निरीक्षण या सर्वेक्षणात नोंदविण्यात आले आहे. प्रियांका बोंबले आणि हेमखोथांग लंगडीम अशी या सर्वेक्षण अहवालाच्या लेखकांची नावे आहेत.

आम्हाला हिंदुत्व सिध्द करायची गरज नाही: उद्धव ठाकरे

विदर्भातील एकूण ३०० कुटूंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी ३४.७ टक्के शेतकऱ्यांमध्ये मानसिक आजाराची (सोमॅटिक सिम्प्ट्म्स) लक्षणे आढळली आहेत. ५५ टक्के शेतकरी तीव्र चिंताग्रस्त असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे सर्वेक्षण करण्यात आलेल्या कुटूंबातील २४.७ टक्के शेतकरी हे तीव्र नैराश्यातून जात असल्याचे आढळून आले आहे. आंतरराष्ट्रीय नियतकालिके क्लिनिकल एपिडेमिओलॉजी आणि ग्लोबल हेल्थ यामध्ये हे सर्वेक्षण प्रकाशित झाले आहे.

अनेकवेळा शेतकऱ्यांना होणाऱ्या मानसिक त्रासाकडे, आजाराकडे दुर्लक्ष केले जाते. हाच विचार करून हा अभ्यास करण्यात आला. यामागे वेगवेगळी कारणे आहेत. मग त्यामध्ये आर्थिक विवंचना, कौटुंबिक समस्या हे सुद्धा आहेत. त्यामुळेच काही शेतकरी आत्महत्या करतात. आपल्यापुढे येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी, त्याच्याशी मुकाबला करण्यासाठी शेतकऱ्यांचे समुपदेशन करणे गरजेचे आहे, असे प्रियांका बोंबले म्हणाले. 

हिंगणघाट प्रकरणातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी

शेतीसाठी ज्यांनी २५ हजारांपेक्षा जास्त कृषी कर्ज घेतले आहे. त्या शेतकऱ्यांमध्ये चिंता आणि नैराश्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचेही या सर्वेक्षणातून दिसून आले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:60 percent Vidarbha farmers suffering from mental illnesses need for experts across rural areas Study