पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना विषाणू : महाराष्ट्रात सहा संशयित रुग्ण

कोरोना विषाणू

चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे  भीतीचं वातावरण आहे. या विषाणूमुळे चीनमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ८० वर जाऊन पोहोचली आहे. भारतातही परदेशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. महाराष्ट्रातील मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर २६ जानेवारीपर्यंत ३ हजार ७५६ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे ६ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यातील ४ रुग्णांना मुंबईतील कस्तूरबा रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे तर दोन संशयित रुग्णांना पुण्यातील नायडू रुग्णालयात  दाखल करण्यात आलं आहे. 

PHOTOS: चीनमध्ये कोरोना विषाणूचा कहर

महानगर पालिकेने चिंचपोकळीच्या कस्तुरबा रुग्णालयामध्ये कोरोनो विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी एका स्वतंत्र वॉर्डची व्यवस्था केली आहे. कोरोना विषाणूमुळे  सर्दीपासून ते श्वसनाच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यास एखाद्या व्यक्तीला ताप, सर्दी, श्वसनास त्रास यासारखी लक्षणे आढळतात. सर्वप्रथम चीनमध्ये या अज्ञात रोगानं पाय ठेवला. चीनमध्ये आतापर्यंत २८०० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाल्याची ४३ प्रकरणे इतर देशांमध्ये समोर आली आहेत. अमेरिकेमध्ये या विषाणूची लागण झालेले ५ रुग्ण आढळले आहेत.

एल्गार परिषद: तपासाची कागदपत्रे ताब्यात घेण्यासाठी NIAची टीम पुण्यात

कोरोना विषाणूची सर्वसामान्य लक्षणे
सर्दी आणि खोकला
गंभीर स्वरुपाची श्वसन संस्थेची लक्षणे
श्वास घ्यायला त्रास होणे, श्वासास अडथळा
न्यूमोनिआ
पचनसंस्थेची लक्षणे - अतिसार
काही रुग्णांमध्ये मूत्रपिंड निकामी होणे
प्रतिकार शक्ती कमी होणे

विषाणूचा प्रसार कसा होतो ?
राज्य सरकारच्या निवेदनानुसार, या विषाणूचा प्रसार कसा होतो याची निश्चित माहिती तूर्त उपलब्ध नाही. मात्र लक्षणांचे स्वरुप पाहता शिंकणे, खोकणे यावाटे हवेमार्फत या विषाणूचा प्रसार होत असावा, असा अंदाज आहे.

मोदी आता शाहीन बागेत का जात नाहीतः काँग्रेस

काय खबरदारी घ्यावी ?
श्वसन संस्थेचा आजार असलेल्या व्यक्तीशी निकट सहवास टाळा
हातांची नियमित स्वच्छता
न शिजवलेले, अपुरे शिजलेले मांस खाऊ नये
फळे, भाज्या न धुता खाऊ नये
खोकताना, शिंकताना नाका-तोंडावर रुमाल धरावा.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: 6 suspected with Coronavirus have been admitted to Kasturba hospital and Pune Naidu hospital