पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नाशिकमध्ये 6 वाडे कोसळले; सुदैवाने जीवितहानी नाही

नाशिकमध्ये वाडा कोसळला

नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे वाडे कोसळल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. जुन्या नाशिक भागामध्ये 6 वाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. सोमवारी रात्री साडेअकरा वाजता नाव दरवाजा परिसरामध्ये 5 वाडे कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेमध्ये जीवितहानी झाली नाही. तर आज पहाटे पाटील गल्ली येथील भांगरे वाड्याचा काही भाग कोसळला. 

राम मंदिर प्रश्नावर आजपासून सुप्रीम कोर्टात रोज सुनावणी

सोमवारी रात्री उशिरा नाव दरवाजा परिसरातील भालेराव वाड्याचा काही भाग कोसळला. या वाड्याची भिंत शेजारी असणाऱ्या वाड्यांवर पडली. त्यामुळे शेजारी असणारे 4 वाडे देखील ढासळले आहेत. यामध्ये कुलकर्णी आणि दीक्षित वाड्याचा समावेश आहे. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदकार्य केले. सुदैवाने या वाड्यांमध्ये कोणीही राहत नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही. तसंच हे वाडे खूप जुने असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; आसनगाव- कसारा रेल्वेसेवा  

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडणारा मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्यामुळे भिंत, वाडे आणि घरं कोसळल्याच्या घटनांची मालिका सुरुच आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये जुन्या नाशिक परिसरात 18 ते 20 वाडे आणि 15 भिंती कोसळल्याची नोंद अग्निशमन दलाकडे आहे. या घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही तसंच जीवितहानी झाली नाही. 

दिल्लीत इमारतीला भीषण आग; 6 जणांचा मृत्यू 11 गंभीर जखमी